गुड न्यूज : ‘त्या’ ५ मुद्द्यांमुळे तासाभरात इन्व्हेस्टर झाले मालामाल; कमावले २ लाख कोटी

शेअर बाजारात मागील आठवड्यात आलेल्या सुस्तीमुळे आता मार्केट आपटणार असे म्हटले जात होते. इतक्यात आज या मार्केटने मोठी उडी घेऊन गुंतवणूकदार मंडळींना मालामाल केले आहे. बाजारातील पाच आकर्षण वाटणाऱ्या कारणांनी इन्व्हेस्टमेंट केलेल्यांचे अवघ्या तासाभरात २ लाखो कोटी वाढले आहेत.

बँक, फायनान्स आणि ऑटो या सेक्टरमध्ये मोठी वाढ झाल्याने अनेकांची चांदी झाली आहे. इंडसइंड बँक, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, अक्षिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांनी आज मोठी उडी घेत अनेकांना पैसे मिळवून दिले.

पुढील कारणांनी शेअर बाजारात वाढ झाली :

  • रायटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार भारतात उत्पादन क्षेत्रात तेजी आहे. मागील ८ वर्षांमध्ये ही तेजी सर्वाधिक आहे.
  • अमेरिकेसह जगभरात पुन्हा एकदा अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरुवात झालेली आहे. करोनाच्या नकारात्मक काळावर जगाने मात करण्यास सुरुवात केली आहे.
  • अनलॉक ५.० यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक सेक्टर आता १५ दिवसात खुले होणार आहेत.
  • बँक शेअर आज खूप तेजीत होते. सर्वच बँकावर इन्व्हेस्टर विश्वास दाखवत आहेत.
  • मागणी वाढण्यास सुरुवात झाल्याने ऑटो सेक्टर रुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here