असा बनवा घरच्या घरी शाही पुलाव; वाचा रेसिपी

रेग्युलर पुलाव आणि शाही पुलाव मध्ये फरक असतो. आता ते तुम्हाला रेसिपी वाचून कळेलच. पण त्यापेक्षा अधिक कळेल जेव्हा तुम्ही हा शाही पुलाव खाणार. बनवा आणि खा मग खऱ्या अर्थाने तुम्हाला रेग्युलर पुलाव व शाही पुलाव मधील फरक कळेल.

ओ मंडळींहो, साहित्य तर बघा की…

१) १ कप बासमती तांदूळ

२) पावणे दोन कप गरम उकळते पाणी

३) ३/४ कप गाजर (लहान चौकोनी तुकडे)

४) ३/४ कप मटार

५) १/४ कप फरसबी (एक इंचाचे तुकडे)

६) २ चमचे तूप

७) १ चमचा काजू बी

८) २ तमालपत्र

९) २ वेलची

१०) २ लवंगा

११) १ हिरवी मिरची (उभी चिरून)

१२) १ चमचा आले लसूण पेस्ट

आणि तुमचा आमचा आवडीचा पदार्थ म्हणजे मीठ तेही चवीपुरते…

तसा शाही पुलाव बनवायला सोपा आहे. कसा बनवायचा तेही वाचा …

१) साधारणपणे सुरवातीला 10 मिनिटे तांदूळ पाण्यात भिजू द्या. मग एक चाळणीत घेऊन पाणी निथळू द्या. 

२) खोलगट नॉनस्टिक पातेले घेऊन त्यात तूप गरम करावे.

त्यात तमालपत्र, लवंग आणि वेलची घालून ८-१० सेकंद परतावे. 

३) हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि काजू घालून परतावे.

४) निथळलेला तांदूळ घ्या. आणि गॅस मध्यम ठेवा. आता तांदूळ कोरडा झाला असेल तर त्यानंतर फरसबी, गाजर आणि मटार घालून १-२ मिनिटे परतावे. 

५) आता उकळते पाणी त्यात ओता. मग त्यात चवीप्रमाणे मीठ टाका. व गॅस जास्त ठेवा. झाकण ठेवले तरी चालले. फक्त लगेच ठेऊ नये. 

६) काही मिनिटातच भाताच्या पृष्ठभागावर पाणी कमी होईल. तेव्हा लगेच आच एकदम मंद करावी. झाकण ठेवून वाफ काढावी.

७) वाफेवर भात शिजू द्यावा. ३-४ मिनिटांनी एकदा असे हलकेच भात तळापासून ढवळावा. शिते मोडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. साधारण १५ मिनिटे वाफ काढावी. 

आता आपला शाहीर पुलाव तयार….

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here