झटकेबाज लसणाच्या पातीची चटणी बनवा; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन, भन्नाट आणि चविष्ट पदार्थ घेऊन आलो आहोत. आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारची चटणी खाल्ली असेल. पण लसणाच्या पातीची चटणी चटणी नसेल खाल्ली… जरी खाल्ली असेल तरीपण ही थोड्या हटके पध्दतीने बनवलेली चटणी खाल्ली तर बोटे चाटत बसाल, इतकी झटकेबाज आणि चविष्ट आहे. तर ही चटणी बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळींहो…

१) एक जुडी लसणाची पात

२) २ हिरव्या मिरच्या

३) मीठ

४) अर्धा चमचा जिरे 

५)  कोथिंबीर.

हे साहित्य घेतले असेल तर चटणी बनवण्यासाठी एकदम सोपी कृती आहे. 

१) लसणाची पात निवडून घेऊन स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावी. 

२) मग त्यात चवीनुसार मीठ, जिरे, थोडी कोथिंबीर आणि २ मिरच्या घालाव्यात.

३) मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.

झाली चटणी तयार…. चटणी खाताना त्यात थोडेसे तेल टाकावे… मग झटकेबाज लसणाच्या पातीची चटणीची चव जगात एक नंबर लागते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here