मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विवेक राहाडेची सुसाईड नोट; वाचा, नेमकं काय म्हणनं होतं त्याचं

बीड :

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. अशातच एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. बीड तालुक्यातील केतूरा गावात राहाणाऱ्या विवेक राहाडेने सुसाईड नोट लिहित राहत्या घरी गळफास घेतला. विवेकच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होऊ शकतो.

नेमकं काय म्हटलं आहे विवेकने सुसाईड नोटमध्ये :-

मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल…

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here