कॉंग्रेसने साधला थेट माध्यमांवर निशाणा; विचारले ‘हे’ सवाल

दिल्ली :

उत्तरप्रदेशमधील हाथरस प्रकरण घडल्यानंतरही अनेक माध्यमांनी या केस विषयी बातम्या दाखवलेल्या नाहीत. आधीच हे विकृत प्रकरण आणि माध्यमांची एकांगी भूमिका यामुळे लोकांमध्ये माध्यमांविषयी संतापाची लाट आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते व माजी आमदार भाई जगताप यांनी ‘कंगणाची भिंत पडल्यावर नंगा नाच करणारी गोदी मीडिया हाथरस घटनेवर गप्प का’?, असा सवाल केला आहे.

योगी च्या राजीनाम्याची मागणी का नाही?, असाही सवल जगताप यांनी ट्वीट करत विचारला आहे. जगताप यांनी केलेल्या ट्वीटवर माध्यमांविरोधात अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मुकेश भोसले यांनी म्हटले आहे की, भाई यांना या मध्ये पैसे कुठे मिळणार?, टि.आर.पी. कुठे मिळणार ? आणि कशाला गरीबा घरची भांडी घासणार हे लोकं. आता तर बहुतेक जनतेला कळून चुकले आहे की कोण सच्चा आहे आणि कोण खोटं बोलणारा आहे.

माध्यमे विकली गेली आहेत, अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया या ट्वीटवर आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधींनीही हाथरस प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, भाजपचे अभियान ‘मुलगी वाचवा’ नाही तर ‘पुरावे लपवा, सत्ता वाचवा’ असे आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here