‘मुलगी वाचवा’ नाही तर ‘पुरावे लपवा, सत्ता वाचवा’; ‘या’ कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

दिल्ली :

‘मुलगी वाचवा,मुलगी शिकवा’ हे भाजपचे मोठे अभियान होते. केंद्र सरकारने या अभियानाचा मोठा इव्हेंट केला होता. परंतु उत्तरप्रदेशमधील हाथरस प्रकरण घडल्यानंतर भाजपविरोधात लोकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. या प्रकरणाचे पुरावेही नष्ट केले गेल्याचा आरोप तेथील पोलीस प्रशासनावर होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे अभियान ‘मुलगी वाचवा’ नाही तर ‘पुरावे लपवा, सत्ता वाचवा’ असे आहे म्हणत कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला.

त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, उत्तरप्रदेशच्या जंगलराजमध्ये लेकींवर जुलूम आणि सरकारची सिनाजोरी चालूच आहे. जिवंत असतानाही कधी लेकींना सन्मान दिला नाही आणि अंत्य संस्काराचा हक्कही काढून घेतला. भाजपचे अभियान ‘मुलगी वाचवा’ नाही तर ‘पुरावे लपवा, सत्ता वाचवा’ असे आहे.

राहुल यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. शिल्पा राजपूत यांनी म्हटले आहे की, हे कोणतं रामराज्य आहे जिथे बहिणी-लेकी सुरक्षित नाहीत.

या ट्वीटवर लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here