पार्थ यांची पुन्हा आजोबांविरोधात भूमिका; वाचा काय घडलाय प्रकार

मुंबई :

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे त्याचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मराठा आरक्षण हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अशातच बीड तालुक्यातील एका युवकानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार यांनी ट्वीट करत ‘विवेक सारखी तरुण मुलं आत्महत्या करत आहेत, आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागं होऊन तत्काळ मराठा आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवं’, आपले आजोबा शरद पवारांविरोधात भूमिका घेतली आहे.

२ दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भाजपकडून खासदार झालेल्या दोन्ही राजेंना केंद्राकडून आरक्षण मिळवून द्यावं असा खोचक सल्ला दिला होता. मात्र पार्थ यांनी  ‘राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालावं’, अशी विनंती केली आहे.

नेमकं काय म्हटले पार्थ पवार :-

विवेक सारखी तरुण मुलं आत्महत्या करत आहेत, आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागं होऊन तत्काळ मराठा आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवं. मराठा समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय किंवा अन्य विचार करावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा विवेक सारख्या अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागू शकतो आणि हेच टाळण्यासाठी राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालावं अशी मी विनंती करतो. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here