‘त्या’ ६ शेअरद्वारे झुनझुनवालांनी कमावले १५६९ कोटी; पहा मागच्या तिमाहीत त्यांच्या कमाईचा ग्राफ

सुप्रसिद्ध इन्व्हेस्टर राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफ़ोलिओवर भारतातील अनेकांचे लक्ष असते. जगभरात जसे दिग्गज इन्व्हेस्टर वॉरेन बफे यांचा फोलोअर आहे, तसाच भारतात झुनझुनवाला यांचा आहे. मागील तिमाहीत या भारतीय इन्व्हेस्टरने करोनाच्या बदलासह इन्व्हेस्टमेंटमध्ये बदल केला आहे. त्यातल्या फ़क़्त ६ शेअरद्वारे त्यांनी १ हजार ५६९ कोटी रुपये कमावले आहेत.

मागील तिमाहीत म्हणजे जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या तीन महिन्यात सेन्सेक्सने १० टक्के ग्रोथ नोंदवली आहे. त्यामुळे त्याचा स्तर आता ३८,१४२ वर पोहोचला आहे. अशावेळी झुनझुनवाला यांनीही आपली ग्रोथ पक्की करून घेतली आहे. त्यांच्या सर्व शेअरने त्यांना काही काहीतरी मिळवून दिलेले आहे. मात्र, महत्वाच्या आणि त्यांच्या आवडत्या ६ शेअरने त्यांच्या पैशांमध्ये १ हजार ५६९ कोटी रुपये इतकी भक्कम वाढ केली आहे.

त्यांच्याकडे असलेल्या प्रमुख सहा शेअरमधील ग्रोथ अशी (जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर तिमाही) :

टाइटन कंपनी लिमिटेड :

रिटर्न: २६ %
शेयरचा भाव: ९५० यावरून १२०० रुपये
फरक : १२२६ कोटी

 

एस्कॉर्ट लिमिटेड (Escorts Ltd.) :

रिटर्न: २७ %
शेयरचा भाव: १०४० यावरुन १३२० रुपये
फरक : ११९ कोटी

क्रिसिल लिमिटेड

रिटर्न: ११ %
शेयरचा भाव: १६१६ यावरून १७९० रुपये
फरक : ६९ कोटी

रैलीज इंडिया :

रिटर्न: 4%
शेयरचा भाव: २७२ यावरून २८३ रुपये
फरक : २१ कोटी

ल्यूपिन :

रिटर्न: ११ %
शेयरचा भाव: ९१२ यावरून १०१५ रुपये
फरक : ६८ कोटी

जुबिलेंट लाइफ साइंस

रिटर्न: १२ %
शेयरचा भाव: ६५६ यावरून ७३६ रुपये
फरक : ६६ कोटी

स्त्रोत : www.financialexpress.com

संपादन : सचिन मोहन चोभे

ADVT. गुंतवणूक शास्त्र याबाबतच्या माहितीसाठी वाचा हे महत्वाचे पुस्तक..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here