बीड :
चालू वर्षी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. सध्या हा मुद्दा राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. १८ वर्षीय विद्यार्थ्यानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहित त्याने राहत्या घरात गळफास घेतला.
मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीचे अत्यंत तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. सदर विद्यार्थ्याचे नाव विवेक राहाडे असून बीड तालुक्यातील केतूरा गावात ही घटना घडली आहे.
विवेकने लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने निटची परीक्षा दिली असल्याचे सांगितले. तसेच आपण एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा असल्याचेही सांगितले. नीटची परीक्षा दिलेली आहे परंतु आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाली असल्याचेही त्याने नमूद केले आहे.
प्रायव्हेट मध्ये शिक्षण घ्यायची आपली ऐपत नसल्याने आता मनासारखे शिक्षण आपल्याला घेता येणार नाही, असेही त्याने चिठ्ठीत म्हटले होते. आरक्षण असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट