ठाकरे सरकारला पाठींबा असणाऱ्या ‘त्या’ पक्षाच्या नेत्यांनी दिल्या आदित्य ठाकरेंविरोधात घोषणा; वाचा अधिक

मुंबई :

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुर्लक्ष करतात. आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा देऊनही ते आमचे काम ऐकत नाहीत. विशेष म्हणजे ते लोकप्रतिनिधींचाही साधा फोनही उचलत नाहीत, असे आरोप करत समाजवादी पक्षाचे नेते आ.अबू आझमी यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली.

अधिक माहिती सांगताना आझमी यांनी सांगितले की, एसएमएस नावाच्या कंपनीमुळे प्रचंड प्रदूषण होत आहे. सदर कंपनीमुळे मानखुर्द शिवाजीनगर भागातील प्रदूषणाची समस्या वाढत आहे. या प्रदूषणामुळे तब्बल १२ लाख लोकांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ही कंपनी बंद करा, अशी मागणी आझमी यांनी केली. या मागणीचे फलक दाखवत आझमी यांनी आदित्य यांच्याविरोधात घोषणाही दिल्या.

मंत्रीपद मिळाल्यापासून आदित्य ठाकरे अशा प्रकारच्या आंदोलनाला कदाचित पहिल्यांदाच सामोरे जात असावेत. आता यावर आदित्य ठाकरे नेमकी प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान घोषणाबाजी करताना आझमी यांच्यासह नगरसेवक अख्तर कुरेशी, नगरसेविका रुकसाना सिद्धिकी, आयशा रफिक शेख, सायरा फहाद आझमी, इरफान खान आदी उपस्थित होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here