पोल्ट्री शेडच्या स्वच्छतेची ‘ही’ काळजी घ्या; नाहीतर होऊ शकतात ‘ते’ दुष्परिणाम

कुक्कुटपालन हा खूप काळजीपूर्वक करण्याचा व्यवसाय आहे. फलोत्पादनामध्ये ज्या पद्धतीने द्राक्ष व डाळिंब यांची खास काळजी घ्यावी लागते. त्याच पद्धतीने पशुसंवर्धनाच्या (पक्षीसंवर्धन असेही म्हणू शकता हवे तर) या व्यवसायात पोल्ट्री हेही खूप सेन्सेटिव्ह आहे. त्यामुळेच यातील प्रत्येक छोट्यामोठ्या घटकांकडे व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थापन करावे.

पिल्ले शेडमध्ये आणण्यापूर्वी खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच आपण पुढील मुद्द्याद्वारे स्वच्छतेचे महत्व समजून घेणार आहोत.

  1. शेडमधील कोंबड्या विक्रीसाठी गेल्यानंतर पुढच्या लॉटचे पिल्ले येण्यापूर्वी शेड स्वच्छ आणि टापटीप करून ठेवावे.
  2. शेडमधील सर्व खत आणि बाहेर पडलेला कचरा यांचे संकलन करून त्यांना पोत्यात भरून विक्रीसाठी पाठवून द्यावे. तसेच बाहेरील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
  3. जर तातडीने खत विक्री शक्य नसल्यास किंवा त्याची साठवणूक करण्याची गरज असल्यास अशावेळी शेद्पासून किमान ३०० मीटर अंतरावर त्या खताच्या गोण्या ठेवाव्यात. तसेच त्याची साठवणूक उत्तर अथवा दक्षिण या दोन्ही बाजूंना अजिबात करू नये.
  4. शेडमधील कोंबड्या गेल्यानंतर सर्व खताची विल्हेवाट लावावी. तिथे पिसे व अगोदरची धूळ राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  5. शेड धुताना प्रति १० लिटर गरम पाण्यात ४०० ग्रॅम धुण्याचा सोडा टाकून बनवलेले द्रावण (मिश्रण) किमान ६ तासांसाठी टाकून ठेवावे. हे मिश्रण सगळीकडे योग्य पद्धतीने पोहोचेल याची खात्री करून घ्यावी.
  6. हे झाल्यावर मग १० लिटर पाण्यामध्ये २०० ग्रॅम कॉस्टिक सोडा मिसळलेले द्रावण १२ तासांसाठी सर्व भागात पोहचेल असेच टाकून ठेवावे.
  7. त्यानंतर मगच सर्व शेड पाण्याने धुवावे. तसेच खाद्य आणि पाण्याची भांडी हायड्रोक्लोराईड या अॅसिडचा वापर करून धुवावीत.
  8. बाजूचे पडदे धवून घेतल्यावर वळवून घ्यावेत. तसेच असे पडदे जर तसे धुणे शक्य नसेल तर ते निर्जंतुक करून घ्यावेत.
  9. शेडभोवती पडदे लावल्यावर मग १० लिटर पाण्यामध्ये अर्धा लिटर फोरमेलीन यांचे द्रावण करून सगळीकडे फवारणी करावी.
  10. सगळ्या भागातील भिंती व खालचा कोबा यांच्यावर चुना पावडर, रॉकेल (केरोसीन) आणि फोरमेलीन यांचा रंग देऊन निर्जंतुकीकरण करावे.

पोल्ट्री शेडमध्ये स्वच्छता हा घटक खूप महत्वाचा आहे. नवीन आलेल्या पिल्लांना कोणत्याही पद्धतीने रोगाची लागण होणार नाही यासाठी वरील मुद्द्यांनुसार स्वच्छता व्यवस्थापन आवश्यक आहे. इथे एक किरकोळ चूक लाखो रुपयांचा झटका देऊ शकते हे पुन्हापुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीच म्हणा..!

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

(क्रमशः)

ADVT. From Amazon

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here