नीट समजून घ्या अनलॉक ५.०; पहा नेमके काय उघडणार आणि काय बंदच राहणार

करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराला लॉकडाऊन करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेरीस आता अनलॉक करण्याची नामुष्की सरकारवर आलेली आहे. लॉकडाऊन करून याव होणार, त्याव होणार असे आता कोणतीही सरकारी यंत्रणा म्हणत नाही. कारण, त्यामुळे साध्य झालेले आर्थिक नुकसान आता जगजाहीर झालेले आहे. अशावेळी आजपासून काळजी घेऊन जगण्याच्या पुढच्या टप्प्यातील अनलॉक ५.० यास सुरुवात होत आहे.

टाळेबंदी उठवण्याच्या या पाचव्या टप्प्यात सर्वांनी एकमेकांची काळजी घेऊन जगण्याच्या विचारला आणखी चालना देण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणे आता निम्म्या क्षमतेने चालवण्याला परवानगी मिळणार आहे. तर, शाळा आणि कॉलेज यांना उघडण्यासाठीचेही वेळापत्रक ठरवले जाणार आहे. हा निर्णय घेतल्याने टाळेबंदीमुळे लॉक झालेले धंदे. त्यांचे मालक आणि कामगार यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. लॉकडाऊनमुळे या व्यवसायांना मोठा फटका बसला होता.

इथे मिळणार असा दिलासा :

  • केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करून सर्व एकपडदा आणि बहुपडदा सिनेमागृह आता चालू होतील. फ़क़्त तिथे एकूण असं क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश असेल.
  • दि. १५ ऑक्टोबर २०२० पासून सर्व सिनेमागृह यांच्यासह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खेळण्याची ठिकाणे सुरू होतील.
  • त्यानंतर राज्यातील शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारला असेल.
  • संशोधन करणाऱ्या आणि पीएचडी आदि पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कार्यानुभव सुरू होतील.
  • मनोरंजाची ठिकाणे, व्यायामशाळा आणि शिक्षणाची ठिकाणे सुरू करण्यासाठी दिशानिर्देश जारी करण्यात येतील. त्यांचे पालन करावे लागणार आहे.

इथे आणि अशी असेल यापुढेही पाबंदी :’

  • सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, धार्मिक किंवा कोणत्याही कार्यक्रमास १०० जणांची मर्यादा असणार आहे.
  • रेड झोनमध्ये मात्र यापुढेही अशा कार्यक्रमाना बंदी कायम असणार आहे.
  • दि. ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीपर्यंत कंटेनमेंट झोन जाहीर करण्याच्या नियमावली यापुढेही जारी असतील.
  • व्यावसायिकांसाठीच्या प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्यांना वाणिज्य मंत्रालयाच्या सूचना व नियमावली यानुसार कार्यक्रमांचे आयोजन करता येईल.
  • ज्येष्ठ नागरिक, मुले, आजारी व्यक्ती व गर्भवती महिला यांनी बाहेर पडू नये. आवश्यक गरज असतानाच त्यांनी बाहेर यावे. त्यावेळी सर्व काळजी घ्यावी.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here