म्हणून राहुल आणि प्रियांका गांधी थेट पायी निघाले हाथरसला; अंतर 142 किलोमीटर…

दिल्ली :

देशाच्या राजकीय पटलावर सध्या हाथरस प्रकरण चर्चेत आहे. हाथरस प्रकरणावरून उत्तरप्रदेश सरकार आणि पोलीस प्रशासनावर मोठी टीका होत आहे. या प्रकरणामुळे देशाच्या जनतेत संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज सकाळी हाथरसकडे प्रस्थान केले होते. मात्र त्यांना ग्रेटर नोएडा मध्ये अडवलं गेलं. तिथून ते दोघे पायी निघालेत. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ग्रेटर नोएडा ते हातरस असे 142 किलोमीटर अंतर असताना गांधी भावंडे पायी निघालेली आहेत.

यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत. समाजमाध्यमांवर त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. जनतेच्या मनातील संताप ओळखून कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. कृषी कायदा आणि हाथरस प्रकरण या दोन्हीही ट्रेंडमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवरून कॉंग्रेस आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे. सकाळी राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, उत्तरप्रदेशच्या जंगलराजमध्ये लेकींवर जुलूम आणि सरकारची सिनाजोरी चालूच आहे. जिवंत असतानाही कधी लेकींना सन्मान दिला नाही आणि अंत्य संस्काराचा हक्कही काढून घेतला. भाजपचे अभियान ‘मुलगी वाचवा’ नाही तर ‘पुरावे लपवा, सत्ता वाचवा’ असे आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here