सोन्याच्या दरात पुन्हा घट; जाणून घ्या आजचे दर

मुंबई :

सोन्याच्या दारात दिवसेदिंवस लक्षणीय घट झालेली पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर कमी का झाले याविषयी तज्ञ मंडळी आपापल्या पद्धतीने विश्लेषण करत आहेत. मात्र सोन्याच्या दरात होणारी घट आता अनेक दिवस स्थिर असेल, असेही बोलले जात आहे. गेल्या 6 महिन्यात सोन्याच्या दरात जवळपास ६ हजारांची घसरण झाली आहे. 7 ऑगस्टला सोनं प्रतितोळा ५६ हजार २०० रुपये इतकं होतं मात्र आता सोन्याचा दर प्रति तोळा ५०४५६ आहे.

चांदीचे दर मात्र घटत चालले आहेत. प्रति किलो चांदीचे दर ६११०० इतके असल्याचं पाहिलं गेलं. चांदीच्या किमत १३६६ रुपयांनी उतरली. आज सकाळच्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याचे दर २२५ रुपयांनी कमी झाले. 

येते काही महिने सोन्याचे भाव स्थिर राहतील. त्यात विशेष बदल होणार नाहीत, असा अंदाज सांगितला जात आहे. वर्षाच्या शेवटी मात्र भाव वाढू शकतात. डिसेंबरच्या अखेरीस सोन्यानं आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला असेल, असे मत सराफा बाजारातील व्यावसायिकांनी व्यक्त केले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here