‘त्या’ महामारी दरम्यान हुकुमशाही शक्तींचे वागणे आत्तासारखेच; व्हीडीओच्या माध्यमातून कॉंग्रेसने दिली उजळनी

दिल्ली :

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. सरकार विविध पातळ्यांवर अपयशी ठरल्याचे दिसत आहे. अशातच कॉंग्रेसने एक व्हिडीओ समोर आणत १०० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आजपासून जवळपास १०० वर्षांपूर्वीदेखील महामारी दरम्यान हुकुमशाही शक्तींचे वागणे आत्तासारखेच होते. तेव्हा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात अहमदाबादेतील कामगारांनी इंग्रज राजवटीला गुडघे टेकायला भाग पाडले. शेतकरी – कामगार यांच्या एकतेचा तो वारसा आजही जीवंत आहे, असे कॉंग्रेसने व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले आहे.

शेतकरी विरोधी कायदा आणल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविध पातळ्यांवर त्याचे पडसाद उमटलेले दिसत आहेत. कॉंग्रेसही या शेतकरी विरोधी कायद्याबाबत प्रचंड आक्रमक झाली आहे. कॉंग्रेस सत्तेत असलेल्या महाराष्ट्रातही हा कायदा थेट रद्द करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here