‘ते’ आधी बघा नंतर उत्तर प्रदेशचं बघा’; भाजप नेत्याने गृहमंत्र्यांना सुनावले

मुंबई :

उत्तरप्रदेशमध्ये घडलेल्या हाथरस प्रकरणावरून सध्या राजकीय वाद-विवाद सुरु आहेत. जनतेमध्येही या प्रकरणावरून संतापाची लाट उसळलेली आहे. तसेच विरोधीपक्षाच्या नेत्यांनीही या प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘उत्तर प्रदेशचं नंतर पाहावं, आधी राज्यात लक्ष घालावे’, असे भाजप आमदार व नेते अतुल भातखळकर यांनी  सुनावले आहे.

भातखळ कर म्हणाले की, निल देशमुखसाहेब बलात्कार हा घृणास्पद अपराधच आहे, पण आपल्या पायाखाली काय जळतंय ते आधी बघा… उत्तर प्रदेशचं नंतर बघा, अहमदनगरमध्ये एक पोलीस अधिकारीच तरुणीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालाय… त्या तरुणीला आधी न्याय मिळवुन द्या.

भातखळकर यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. के.गंगा यांनी म्हटले आहे की, का यूपी म्हणलं की, लय आग होतीय वाटतं मराठी भय्यांची, यूपी मध्ये योगी आदित्यनाथ राम आहे आणि तिकडं केंद्रात तुमचा कृष्ण आहे, महाराष्ट्रात होईल शिक्षा त्या पोलिसाला पण यूपी मध्ये १५ दिवस तर फेक न्यूज म्हणून दाबून ठेवलं सगळं, कशाला दुसऱ्याचं वाकून बघता, स्वतःच उघडं आहे ते बघा.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here