‘ते’ तर सोनियांच्या ताटाखालचे मांजर; ‘या’ भाजप नेत्याची जहरी टीका

मुंबई :

केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. पणन संचालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी काही तासात आमदारांच्या अपीलावर सुनावणी घेऊन अध्यादेश रद्द करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारसह उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ‘आपल्या सरकारचा आदेश आपणच रद्द करण्याचा भीम पराक्रम केला आहे. सोनियांच्या ताटाखालचे मांजर असल्याचे पुन्हा सिद्ध केले’, असे म्हणत भातखळकर यांनी टोला लगावला.

केजरीवाल यांना फार मागे टाकून उद्धवजी बनले देशाचे नंबर १ U Turn मुख्यमंत्री… केंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश ठाकरे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे, असेही त्यांनी ट्वीट करत सांगितले.

कसा झाला अध्यादेश रद्द :-

कॉंग्रेस हा अध्यादेश रद्द करण्यासाठी आक्रमक झाली होती. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसशासित राज्यांना या अध्यादेशाला पर्याय सुचवा अशा सूचना दिल्या होत्या. अध्यादेशाला स्थगिती न दिल्यास कॅबिनेटला अनुपस्थित राहण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला होता. अखेरीस अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here