केंद्र सरकारचा ‘तो’ अध्यादेश ठाकरे सरकारकडून रद्द; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :     

नुकतेच केंद्र सरकारने काही कायदे पारित करून घेतले. यात कृषी आणि कामगार सबंधित कायदे आहेत. कृषी कायद्यावरून सध्या देशभरात आंदोलन सुरु आहे. अशातच ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेत केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेरीस रद्द केला आहे.

सदर आदेश रद्द केला जाणार आशयाची माहिती आधीच ठाकरे सरकारने दिली होती. परंतु पणन संचालकांचा याला विरोध होता. अखेरीस आमदारांच्या अपीलावर सुनावणी घेऊन अध्यादेश रद्द केला गेला.  

या प्रकरणात अशी होती कॉंग्रेसची भूमिका :-

जर अध्यादेश स्थगित केला नाही तर आम्ही कॅबिनेटला अनुपस्थित राहू, असा इशारा कॉंग्रेसने दिला होता. या प्रकरणात कॉंग्रेस प्रचंड आक्रमक झालेली आपल्याला दिसली.

केंद्राने दिलेला आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या पणन विभागाच्या वतीने आदेश काढण्यात आले. अगदी सुरुवातीपासूनच ठाकरे सरकार या अध्यादेशाला स्थगिती देण्याचा विचार करत होते.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here