हाथरस प्रकरण : ‘त्या’ संतप्त शिवसेना नेत्याचा सवाल; न्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का?

मुंबई :

सध्या देशाच्या राजकीय पटलावर मराठा आरक्षण आणि हाथरस प्रकरण चर्चेत आहे. हाथरस प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकार तसेच प्रशासनाविरुद्ध देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत ‘एका गरीब मुलीला न्याय मिळू नये का? का न्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का?’, असा सवालही उपस्थित केला आहे.

अधिक बोलताना ते म्हणाले की, जिथं राम मंदिराची उभारणी होत आहे तिथे हाथरससारख्या जिल्ह्यात मुलीवर बलात्कर होतो, हत्या होते, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. एरवी कोणाच्या घराची कौलं जरी उडवली, एखाद्या नटीवर अन्याय, अत्याचार झाला म्हणून ओरडणारे आता कुठेत? तो मीडिया कुठे? एका गरीब मुलीला न्याय मिळू नये का? न्याय मागण्यासाठी एखादी नटी, अभिनेत्रीच हवी आहे का?

पुढे बोलताना त्यांनी रामदास आठवलेंवरही निशाणा साधला. राऊत म्हणाले की, रामदास आठवले जे नटीच्या घरी जाऊन सुरक्षा देत होते, नटीच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्ते होते ते गेले कुठे? काल राजभवनात गेले होते. एकेकाळी खंबीरपणे लढणारी दलित चळवळ निस्तेज होताना दिसतोय. एका दलित मुलीवर अत्याचार होतो, बलात्कार होतो आणि कोणीही उसळून उठत नाही.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here