झटपट करा, पटापट खा – ‘पापड पोटॅटो रोल’

तर मंडळींहो झटपट आणि चमचमीत खाण्याचे पदार्थ आम्ही सांगणे आणि तुम्ही बनवून खाणे एवढेच आपले काम. खाण्यासाठी जन्म आपुला ही ओळ बहुदा आपल्यासाठीच तय्यार झाली असावी. आज आम्ही सांगत आहोत एक चटपटा रेसिपी… तयार करा आणि नक्कीच खा.. आपल्याला आवडेल.

साहित्य घ्या मंडळींहो…

1)पापड

2) बटाटे (उकडलेले) 

3) मैदा

4) बारीक चिरलेली मिरची

5) लाल मिरची पावडर

6) गरम मसाला

7) लिंबू रस 

8) कोथिंबीर

9) तेल 

आणि आपला नेहमीचा आवडीचा घटकपदार्थ मीठ घ्या हो… ते ही चवीनुसार

आता हे सगळं घेतलं असेल तर वाट कसली बघताय… करा की सुरुवात बनवायला…

1) एका भांड्यात मैदा घ्या. त्यात चार कप पाणी टाका व मिक्स करून घ्या. 

2) बटाटे, हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर हे दुसर्‍या भांड्यात घ्या व  मिक्स करून घ्या. 

3) लांब व सपाट करण्यासाठी हाताने रोल करा.

4) पापड एका ताटात तुकडे करून ठेवा.

5) कढईत तेल गरम करायला घ्या,  बटाटा रोल पिठाच्या मिश्रणामध्ये बुडवा. 

6) आता पापडच्या तुकड्यांवर रोल करा म्हणजे त्यात तुकडे चांगलेच चिकटून राहतील.

7) गरम तेलात चांगले तळून होईपर्यंत ठेवा. 

आता हे रोल खाण्यासाठी तयार झाले आहेत. हिरवी चटणी, सॉस सोबत तुम्ही हे रोल तुम्ही खाऊ शकता. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here