अशी बनवा झटपट शेवभाजी; वाचा आणि नक्कीच ट्राय करा

घरी भाज्या शिल्लक नसल्या की बहुतांश लोकांचा आवडीचा पर्याय म्हणजे शेवभाजी बनवणे. परंतु त्यात वेळ लागतो. मग आम्ही सांगतो त्या पद्धतीने चविष्ट शेवभाजी बनवा तीही अवघ्या १० मिनिटांत… आणि अजून एक म्हणजे ही रेसिपी सोपी असल्याने पुरुष सुद्धा बनवू शकतात. 

तर साहित्य घ्या मंडळीहो…

• जाड शेव

• एक वाटी बारीक चिरलेला कांदा

• एक बारीक चिरलेला टोमॅटो

• आलं

• लसूण पेस्ट १ चमचा

• बेडगी मिरची लाल तिखट

• अर्धा चमचा धने पावडर

• बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी

• जिरे

• मोहरी

• हळद

• तेल

• मीठ

हे साहित्य घेतले असेल तर बनवायला पण घ्या… 

१) सुरुवातीला एका कढईत तेल तापवून घ्या. मग त्यात  मोहरी व जिरे तडतडून घ्यावे. 

२) आता कांदा आणि टोमॅटो घालून परतून घ्यावे. 

३) कांदा, टोमॅटो मऊ होण्यास सुरूवात झाल्यावर त्यात आलं, लसणाची पेस्ट घालावी आणि पुन्हा परतावे.

४) हळद, लाल तिखट, निम्मी कोथिंबीर, धने पावडर आणि मीठ घाला व चांगले एकजीव होईपर्यंत परत परतून घ्यावे.

५) मिक्सच्या भांड्यात दोन लहान चमचे शेव फिरवुन घ्या आणि ती मिश्रणात घाला.

६) सगळ्यात शेवटी या मिश्रणात दोन वाट्या गरम पाणी घाला. गरम पाणी घातल्याने रश्श्याला लाल तरी येईल. 

झाली तुमची शेवभाजी तीही झटपट आणि चविष्ट..

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here