रोज वाटीभर दही खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे; वाचा अधिक

दही खाणे हे आरोग्यदायी आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण दही खाल्ल्याने काय फायदे होतात हे नेमके माहिती नसते. म्हणूनच आज आम्ही आपल्याला पौष्टिक अशा दहीचे फायदे सांगणार आहोत. दह्यात प्रोटीन्‍स, कॅल्शियम, रायबोफ्लेवीन, व्हिटामीन बी आदी घटक असतात.

जाणून घ्या फायदे :-

1) दही शरीरातील अशक्तपणा दूर करते. 

2) पचनशक्ती वाढवते.

3) पोट बिघडले असेल तर दही भात खा. पोटदुखी कमी होईल.

4) दह्यात असलेल्या कॅल्शियममुळे दात व नखे हे मजबूत राहतात. 

5) दह्यामुळे कॉलेस्‍ट्रॉल नियंत्रणात येते. त्यामुळे हृदयाचे आजार होत नाहीत.

6) जर दह्यात थोडे हिंग मिसळून खाल्ले तर सांधे दुखी, गुडघे दुखी यासारखे आजार कमी होतात.

7) दह्यात जर खोबरे आणि बदाम टाकून खाल्ले तर वजन वाढते.

8) दह्यात मध टाकून खाल्‍ल्‍या नंतर सौंदर्यात भर पडते.

9) दही खाल्‍ल्‍यानंतर शरीरातील रोग प्रतिकारक शक्‍ती वाढते. 

10) जर आपणास दमा असेल तर रोज दही घेतल्यास आराम मिळेल.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here