धर्माचा, ना सायन्सचा, शेठ आहे ‘त्यांचा’; कॉंग्रेसची जहरी टीका

मुंबई :

दिवसेदिंवस अनेक क्षेत्रातील सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण करण्यात येत आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असते. अशातच सध्या चालू असलेल्या कृषी विधेयाकांवरून देशात मोठी संतापाची लाट उसळलेली आहे. त्यावरूनही शतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन रान उठवले आहे. व्यापाऱ्यांचे हित बघणारे हे सरकार असल्याचा आरोप मोदी आणि मंत्रीमंडळावर नेहमीच होत असतो. अशातच ‘धर्माचा, ना सायन्सचा, शेठ आहे रिलायन्सचा’, असे म्हणत कॉंग्रेस नेते व माजी आमदार भाई जगताप यांनी मोदींवर निशाणा साधला.

हाथरस प्रकरणावरूनही जगताप यांनी केंद्र सरकारला लक्ष केले. जगताप यांनी म्हटले की, जीभ त्या पिडीतेची कापली आणि मुके तुम्ही झालात. मध्यरात्री अंधारात अंत्यसंस्कार? हाच तुमचा बेटी बचाओची घोषणा आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सध्या देशात मराठा आरक्षण, हाथरस प्रकरण आणि सातत्याने होणारे खाजगीकर्ण हे मुद्दे चर्चेत आहेत. या आणि अशा कित्येक मुद्द्यांवरून जनता मोदी सरकारवर नाराज आहे.        

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here