उत्तरप्रदेश सरकारची ‘ती’ लज्जास्पद चाल; संतप्त राहुल गांधींनी सुनावले

मुंबई :

हाथरस प्रकरणावरून आता देशभरात संतापाची लाट उसळत आहे. सत्ताधारी पक्ष, स्थानिक प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच सदर पिडीतेच्या कुटुंबियांची विरोध असतानाही तिचा अंत्यसंस्कार पोलिसांनी उरकून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला. ‘दलित समाजाला दाबण्यासाठी तसेच त्यांना समाजातील स्थान दाखवून देण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने खेळलेली ही लज्जास्पद चाल आहे.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, याच घृणास्पद विचारांविरुद्ध आमची लढाई आहे. ४ तासापूर्वी त्यांनी ट्वीट करत सांगितले होते की, भारताच्या एका मुलीवर अत्याचारकरून तिची हत्या केली जाते. आणि त्याचे पुरावे दाबले जातात. आणि अखेरीस त्या पिडीतेच्या कुटुंबाचा तिचे अंत्यसंस्कार करण्याचा हक्कसुद्धा हिरावून घेतला जातो. हे सर्व अपमानास्पद आणि अन्यायकारक आहे.   

कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध करत तेथील सरकार आणि प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here