म्हणून ‘ते’ शेअर देऊ शकतात मस्त परतावा; पहा आणि मगच निर्णय घ्या

यंदाचे वर्ष हे करोनाचे वर्ष म्हणून जगाच्या इतिहासात ओळखले जाईल. कारण, अवघे जग या समस्येच्या विळख्यात अडकले आहे. त्यातून कसा मार्ग काढावा हेच अनेकांना समजेनासे झाले आहे. अशावेळी बाजारातील काही शेअर खूप पडले आहेत. तेच पुढील काळात मस्त परतावा देऊ शकतात असे फायनान्शियल एक्स्प्रेसच्या बातमीत म्हटले आहे.

त्यांनी यामध्ये 65 टक्के इतके पडलेले मात्र कंपनीची उत्तम स्थिती असलेले शेअर निवडले आहेत. त्यात म्हटले आहे की, हे शेअर 67 टक्के चांगला परतावा देऊ शकतात. चार शेअरची यादी त्यात दिलेली आहे. पहिल्या स्थानावर त्यांनी इंडसइंड बँकेला स्थान दिले आहे. LKP सिक्योरिटीज यांनी यामध्ये उत्तम ग्रोथ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. हा शेअर 65 टक्के खाली आलेला आहे.

तर, हॉटेल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या चालेट होटल हा शेअर ६० टक्के खाली आलेला आहे. त्यासह लाइफस्टाइल क्षेत्रातील रेमंड आणि बँक सेक्टरमधील RBL बँक यांचेही शेअर खाली आले असून मस्त परवता देतील असे बातमीत म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता.क. : शेअर बाजारातील गुंतवणूक ही स्वतः:चा अभ्यास करून करावी. कोणत्याही कंपनींच्या बातमीवर लगेच विश्वास ठेऊन गुंतवणूक करू नये. ही माहिती फ़क़्त रेफरन्ससाठी वापरावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here