तर शेअर बाजारात फुटेल बॉंब; पहा नेमके काय म्हटलेय जिम रॉजर्स यांनी

सुप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट टायकून जिम रॉजर्स यांनी ET NOW यांना दिलेल्या मुलाखतीत शेअर बाजारातील भविष्याचा आडाखा मांडला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भविष्यात जगभरातील बाजारात मोठा बॉंब फुटू शकतो. अशावेळी अनेकांना मोठा झटका बसेल.

मुलाखतीत त्यांनी पुढील दशकाच्या मार्केटचे अंदाज मांडले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, सध्या तेजीचे (बुल) मार्केट आहे. अशावेळी मोठे शेअर खूप वेगाने वाढतात. तर, कमी झालेले शेअर आणखी आपटतात. सध्याही असेच घडत आहे. भारतात वाढत असलेले कर्ज लक्षात घेता भविष्यात अनेक कंपन्या आपटी खाऊ शकतात. यामध्ये दिग्गज वाटणाऱ्या कंपन्याही असू शकतात.

जर जागतिक बाजारात बेअर मार्केट ट्रेंड आला तर त्याचा फटका भारतासह अनेक गरीब देशांना जास्त बसेल. अशावेळी कोणतेही शेअर मोठी आपटी खाऊ शकतात. बँक सेक्टरमध्ये मोठी मंदी आहे. त्याचवेळी सरकार मदत करीत असल्याने काही शेअर वाढत आहेत. मात्र, एकूण परिस्थिती तितकी अनुकूल वाटत नाही. पुढील दशकभरात याचे पडसाद दिसतील, असे रॉजर्स यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ज्या बँक आधुनिकीकरण आणि स्पर्धात्मकता यांचा मेळ घालून योग्य असे बदल करतील त्यांची मोठी ग्रोथ होईल. इतर मात्र मग मागे पडण्याची शक्यता आहे. अशावेळी मग सोने, चांदी आणि इतर धातू यांच्यातील गुंतवणूक वाढेल. त्यासाठी सगळ्यांनी बाजाराचा कल लक्षात घेऊन मोठ्या आपटीपूर्वीच आपण पैसे मिळवून घेण्याची काळजी घ्यावी. पुढील दशकात अशा अनेक घडामोडी बाजारात अडकाठी अनु शकता असेही त्यांना वाटत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here