करोना आणि त्यामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्था आणखी गर्तेत सापडली आहे. अशावेळी देशभरातील कोट्यवधी मंडळी बेरोजगार झालेले आहेत. अशा मंडळींसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही महत्वाची बातमी आहे.
सणासुदीचा कालावधी येण्याची अवघा देश वाट पाहत आहे. आर्थिक गर्तेत सापडलेल्या अनेकांना दसरा आणि दिवाळी या फेस्टीव्हल सीजनमध्ये काहीतरी संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी बाजार तयार होत आहे. त्यामुळे देशभरात या कालावधीत अनेकांना नवीन नोकऱ्या आणि रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नेल्सन या संस्थेने अमेझॉन सेलर्स यांच्या सर्वेक्षणातून हा महत्वाचा मुद्दा मांडला आहे.
मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगलुरु, पुणे, अहमदाबाद, लखनऊ, लुधियाना, इंदौर, नागपुर, कोयम्बटूर, कोच्चि, पटना, जयपुर आणि राजकोट या महत्वाच्या शहरामधील सुमारे २००० अमेझॉन सेलर्स यांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आलेले होते. त्यापैकी ८९ टक्के व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायात आलेली मरगळ फेस्टिव्हल सीजनमध्ये निघून जाण्याचा विश्वास वाटत आहे.
त्याच सर्वांनी नवीन कर्मचारी वाढवण्याची तयारी केली आहे. अमेझॉनला यंदा फ़क़्त फ्लिपकार्ट नाही तर सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमार्ट यांचीही स्पर्धा असणार आहे. त्यातच नव्याने सुरू होणाऱ्या इतर अनेक देशी पोर्टलमुळेही यंदा ऑनलाईन विक्रीमध्ये मोठी चुरस आणि दर्जाबाबतची स्पर्धा सुरू होण्याची अपेक्षा आहे. ग्राहकही त्याचीच वाट पाहत आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव