उपाशी पोटी गुळ खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे

गुळ खाणे हे आरोग्यदायी आहे हे आपणा सर्वानाच माहिती आहे. परंतू प्रत्येकाच्या गुळ खाण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. काही जण जेवल्यावर झोपताना गुळ खातात तर काहीजण नाश्ता झाल्यावर.

तसे तर गुळ कधीही खा, चांगलाच असतो. पण तुम्हाला महिती आहे का? उपाशी पोटी गूळ खाल्ल्यास किती फायदे होतात? नाही ना….

मग जाणून घ्या उपाशीपोटी गुळ खाण्याचे फायदे :-

१) गुळात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि फॉस्फरस आढळते. जे रक्तदाब नियंत्रणासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतात. 

२) गुळाबरोबर आले सेवन केल्यास सांधेदुखीपासून मु्क्ती मिळते.

३) सकाळी अनशापोटी गूळ खाऊन कोमट पाणी प्यायल्यास रक्त स्वच्छ होते.

४) हृदयरोग होण्याचा धोका दूर ठेवण्यासही गुळाच्या सेवनाचा फायदा होता.

५) गुळाच्या नियमित सेवनाने शरीर ताकदवान होते.  शरीरात ऊर्जा पातळी कायम राहाते आणि ती कमी होत नाही.

६) बद्धकोष्ठता, पोटात वायू होणे, अ‍ॅसिडीटीसारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here