‘त्या’ कंपनीने दिला रिलायन्सला हात; आणखी एक ‘ही’ कंपनी देणार आहे साथ..!

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची घोडदौड वेगाने नाही तर वायुवेगाने चालू झालेली आहे. भारतातील ग्राहकांची मोठी संख्या, त्यांची वाढत असलेली क्रयशक्ती आणि जगभरातील उद्योगांचा विश्वास यामुळे आता रिलायन्स ही कंपनी बिग ब्रँड बनली आहे. त्याच रिलायन्स कंपनीच्या रिटेल डिव्हिजनमध्ये आणखी एका मोठ्या कंपनीने गुंतवणूक केली आहे, तर आणखी एक गुंतवणूक करणार आहे.

होय, जागतिक इक्विटी फंड असलेल्या जनरल अटलांटिक यांनी रिलायंस रिटेल वेंचर्स (आरआरवीएल) यामध्ये गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी याची माहिती देताना आनंद व्यक्त केला आहे. जनरल अटलांटिक यांनी रिटेलिंगमधील भविष्य लक्षात घेऊन ३६७५ कोटी रुपये इतकी इन्व्हेस्टमेंट करताना ०.८४ टक्के शेअर घेतले आहेत.

केंद्र सरकारने भारतात रिटेलिंगमध्ये थेट परदेशी कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी आडकाठी घातली आहे. मात्र, अशा पद्धतीने रिलायन्स किंवा बड्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमावण्याची संधी दिलेली आहे. त्याचाच लाभ अशा पद्धतीने रिटेल सेक्टरमध्ये नसलेल्या कंपन्यांनी घेतला आहे. त्यांनी रिलायन्सवर मोठा विश्वास दाखवला आहे.

जनरल अटलांटिक यांनी यापूर्वी एयरबीएनबी, अलीबाबा, आंट फाइनेंशियल, बॉक्स, बाइटडांस, फेसबुक, स्लैक, स्नैपचैट आणि ऊबर यामध्येही गुंतवणूक केली आहे. या कंपनीनंतर आता अबुधाबी येथील मुबादला नावाची कंपनीही रिलायन्स कंपनीला हात देतानाच आर्थिक साथ देऊन पैसे कामावाण्यासाठीचा विचार करीत असल्याचे रॉयटर्स वृत्तसंस्थेने आपल्या बातमीत म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here