‘ती’ गोष्ट कोलांट्या मारण्याइतकी सोपी नाही; ‘त्या’ भाजप आमदाराचा पवारांना टोला

मुंबई :

सध्या मराठा आरक्षणावरून राज्याच्या राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व खासदार शरद पवार यांनी ‘भाजपच्या मदतीने खासदार झालेल्या दोन्ही राजांनी भाजपच्या केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असा सल्ला वजा टोला दोन्ही राजांना लगावला होता. याच पार्श्वभूमीवर ‘मराठा आरक्षणा बाबत भाजपा कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही’, असे म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले.

भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनीही पवारांना सुनावले आहे. राणे यांनी म्हटले की, जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here