राजसाहेबांची ठाम भूमिका आणि ‘त्या’ गोष्टीमुळेच ठाकरे सरकार रुळावर आले; मनसेचा टोला

मुंबई :

लॉकडाऊन दरम्यान डबेवाले, हॉटेलवाले, इतर क्षेत्रातील कामगार अशी अनेक क्षेत्रातील लोकं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागण्यासाठी जात होती. राज ठाकरे सत्तेत नसतानाही त्यांच्याकडे लोक मदत मागायला जातात कसे, याविषयी राजकीय पटलावर चर्चा असायची. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, जनतेचा प्रचंड दबाव, राजसाहेबांची ठाम भूमिका, मनसेचे आंदोलन या मुळेच ठाकरे सरकार रुळावर आले.

लॉकडाऊन दरम्यान देशपांडे यांनीही ठाकरे सरकार तसेच मुंबई मनपावर सतत टीका केली होती. लॉकडाऊन दरम्यान राज ठाकरेंनीही अनेक भूमिका घेतल्या होत्या. म्हणून देशपांडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावत मनसेमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले आहे. देशपांडे यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. राजभक्त यांनी म्हटलेले आहे की, मनसे च्या सविनय कायदेभंग आंदोलनंतर रेल्वे फेऱ्या वाढल्या , लेडीज स्पेशल बद्दल घोषणा झाली. आणि आता संत्री महोदय लोकल सर्वांसाठी अशी घोषणा करताहेत. ढिम्म सरकारला भूमिका घेण्यासाठी मनसेने भाग पाडले.

श्रेयस बोरा यांनी म्हटले आहे की, ज्यांचे स्वःताचे इंजिन रूळावर नाही त्यांचा दबाव कोण मनावर घेत नाही आणि तुमचे राज साहेब अलिबाग मध्ये आहेत रिसॉर्टवर मग ठाम भुमिका कधी घेतली?

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here