जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार; ‘या’ भाजप नेत्याचा हल्लाबोल

मुंबई :

दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत आहेत, त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवून घ्यावा, असा सणसणीत टोला जेष्ठ नेते  शरद पवार यांनी दोन्ही राजांना लगावला. याच पार्श्वभूमीवर ‘जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार’, असे म्हणत माजी खासदार व भाजप नेते नितेश राणेंनी हल्लाबोल केला.

राणे ट्वीट करत म्हणाले की, पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं, आश्चर्य वाटतं… पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला मान काय देणार. या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही.

राणे यांच्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. अमर वारीशे यांनी म्हटले आहे की, पवार साहेब जातीय वाद घडतील अशी वक्तव्य करतात हे वारंवार दिसून आलंय मग राम मंदिर सारखा विषय असो मराठा आरक्षण असो स्पष्ट भूमिका नाहीच अस का? पवार साहेबांच्या काही भूमिका दोन्ही बाजूने असतात चांगला झाला तर मी केलं वाईट झालं तर मी नाही केलं.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here