धक्कादायक : चीनमध्ये आढळलेला ‘तो’ नवा विषाणू; भारतात पसरण्याची ICMRने व्यक्त केली भीती

दिल्ली :

जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना चीनमध्ये अजून एक नाव विषाणू आढळून आलेला आहे. हा नवा विषाणू वेगाने पसरणारा असल्याचीही माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सध्या पावसाळ्याचे परिणामी डासांचे दिवस आहेत. आणि सदर संसर्गजन्य विषाणू हा डुक्कर तसेच डासांच्या माध्यमातून पसरतो आहे. लाइव्ह मींटने दिलेल्या वृत्तानुसार या विषाणूचे नाव कॅट क्यू व्हायरस (सीक्यूव्ही) असून हा विषाणू चीन आणि व्हिएतनाममध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.

भारतात हा विषाणू पसरू शकतो, अशी भीती आयसीएमआर म्हणजेच इंडियन काऊन्सील ऑफ मेडीकल रिसर्चने व्यक्त केली आहे. यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे कर्नाटकच्या रहिवासी असणाऱ्या दोन रुग्णांमध्ये या विषाणूच्या अ‍ॅण्टीबॉडीज सापडल्या आहेत. यापूर्वी कधीतरी त्यांना या रोगाचा संसर्ग झाला असल्याचे पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आयसीएमआरच्या संशोधनात समोर आले आहे.

एकूण ८८३ व्यक्तींचे नमुने संशोधनासाठी वापरले गेले. त्यातील दोन जणांना या विषाणूची कधीतरी बाधा झाल्याचे लक्षात आले. हा विषाणू जंगलातून डास आणि डुक्करांना बाधित करतो. आणि मग मानवापर्यंत येतो, अशी माहिती आयसीएमच्या शास्त्रज्ञांच्या हवाल्याने लाइव्ह मींटने दिली. दरम्यान या विषाणूवर तसेच या विषाणूचा भारतामधील डासांवर कसा परिणाम होतो यावर सध्या संशोधन सुरु आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here