लॉकडाऊन काळातही मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ; दर तासाला कमावताहेत तब्बल ‘एवढे’ कोटी

मुंबई :

रोज श्रीमंतीचे नवनवे रेकोर्ड सेट तयार करणाऱ्या रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती लॉकडाऊनच्या काळातही वाढली आहे. संपूर्ण जग संकटात सापडलं असताना रिलायन्स ऊद्योग समूहानेही मोठी मजल मारली आहे. जीओच्या माध्यमातून जगभरात आपला पसारा वाढविल्यामुळे मुकेश अंबानींची वैयक्तिक संपत्तीही वाढली आहे.  

सद्यस्थितीत दर तासाला जवळपास 90 कोटी रुपये मुकेश अंबानी कमवत आहेत. हुरुन इंडिया आणि आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने समोर आणलेल्या एका अहवालात ही गोष्ट समोर आली आहे. 6,58,400 कोटी संपत्तीसह अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

हुरुन इंडियाच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी हे सलग नवव्यांदा प्रथम स्थानी आहेत. दुसऱ्या स्थानावर लंडनमधील हिंदूजा ब्रदर्स आहेत तर एचसीएलचे संस्थापक शिव नाडर तिसऱ्या स्थानावर आहेत. दिवसेंदिवस कोट्यावधी रुपयांनी वाढणारी अंबानी यांनी संपत्ती गेल्या नऊ वर्षात 2,77,700 कोटींनी वाढून 6,58,400 कोटी झाली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here