धक्कादायक : महाविकासआघाडी सरकारमधील ‘ते’ मंत्रीही झाले कोरोनाबाधित

मुंबई :

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सिनेमा आणि राजकीय क्षेत्रातही कोरोनासंसर्ग वेगाने पसरत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील अजून एक मंत्री कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना स्वतः ट्वीट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, मी कोणाच्या संपर्कात नव्हतो. मात्र, त्याआधी जे आले आहेत, त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.

त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सामंत यांनी सांगितले की, गेले १० दिवस मी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. मी स्वत: कोविड टेस्ट करुन घेतली आहे. रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले १० दिवस कोणाच्या संपर्कात नसल्याने संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तहीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होईल.

दिवसेंदिवस राजकीय क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारमधील अनेक मंत्री कोरोनामुळे बाधित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झालेल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड याही आता कोरोनामुक्त झाल्या आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here