युवक कॉंग्रेसचा आठवलेंवर हल्लाबोल; आठवले दलितांचे कमी आणि ‘त्यांचेच’ जास्त

मुंबई :

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला त्यांनी भाजपसह सरकार स्थापन करण्यासाठी जाहीर आमंत्रण दिले आहे. तसेच सुशांत सिंग प्रकरणी विविध वाद सुरु झाले आणि त्यात नेहमीच आठवले यांनी सहभाग घेतला. याच पार्श्वभूमीवर युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आठवलेंवर निशाणा साधला. तांबे यांनी म्हटले की, आठवले आता दलितांचे कमी आणि बॉलिवुडचे जास्त झालेत. हाथरसपेक्षा त्यांना कधीही नाव न ऐकलेल्या हिरोईन जास्त महत्वाच्या वाटतायेत, असे म्हणत त्यांना टोलाही लगावला.

तांबे यांनी केलेल्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. किरण मर्चंडे यांनी म्हटले आहे की, स्वतःचे राजकारणातील अस्थित्व गमावून बसलेले आठवले या पूर्वी मुळातच असे नव्हते..आज आंबेडकरी जनता आणि एकंदरीत दलित वर्ग खूप संकटातून जात आहे आणि अशात आठवले मात्र दुसऱ्याच कामात गुंतलेले दिसत आहेत. आठवले यांना आपली माणसे केव्हा आठवतील हे आठवलेच जाणो.

काय आहे हाथरस प्रकरण :-

उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे एका दलित महिलेवर चार लोकांनी बलात्कार केला. अखेरीस दिल्ली येथे त्या पिडीत महिलेचा मृत्यू झाला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here