मराठा आरक्षण : दोन्ही राजेंना शरद पवारांचा खोचक टोला

मुंबई :

राज्याच्या राजकीय पटलावर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरून अनेक वाद-विवादही सुरु आहेत. दरम्यान सकाळी सामनाच्या माध्यमातून शिवसेनेनंही उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेविषयी भाष्य केले आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा’, असे म्हणत खोचक टोला दोन्ही राजांना लगावला आहे.

राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीविषयी विचारले असता पवार म्हणाले की, संजय राऊत हे एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांनी आधी माझी मुलाखत घेतली होती. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांचीही मुलाखत घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं त्यांच्या भेटीत राजकीय काहीही नाही. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कुठल्याही परिस्थितीत पाच वर्षे पूर्ण करेल.

दोन्ही राजांनी घेतलेल्या भूमिकांविषयी बोलताना पवार यांनी स्पष्ट केले की, उदयनराजे व संभाजीराजे या दोघांनाही भाजपनं राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यामुळं ते भाजपचीच भाषा बोलणार.      

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here