पालक आवडत नसेल तर ‘या’ चविष्ट डिशची रेसिपी नक्कीच वाचा; एकदा ट्राय करा

मला पालक आवडतं पण फकीर पनिरसोबत किंवा मला पालक अजिबातच आवडत नाही असे म्हणणारे अनेक जण आहेत. परंतु पालक ही हिरवी पालेभाजी आरोग्यदायी आहे. जर तुम्हाला पालक आवडत नसेल तर मुद्दाम ही भाजी करा, आणि खाऊन पहा…

हे साहित्य घ्या मंडळीहो…

१) चिरलेला पालक

२) 30 पाकळ्या लसूण बारिक चिरून 

३) शेंगदाणे

४) तूर डाळ 

५) तेल

६) चिंचेचा कोळ

७) तिखट

८) राई

हे साहित्य घेतले असेल तर साध्यासोप्या पद्धतीने बनवा ही चविष्ट भाजी

१) तूरीची डाळ चांगली शिजवून घ्यावी. 

२) पातेले घ्यावे. त्यात तेल गरम करावे व त्यात चिरलेला पालक टाकावा.

3) पालक परतून घ्यावा मग त्यात शिजवलेली तुरीची डाळ व चिचेंचा कोळ टाकून मग घाटून घ्यावे.

४) आता एका मोठ्या कढईत चार ते पाच मोठे चमचे तेल घेऊन त्यात भरपूर राई, बारिक चिरलेला लसूण फोडणीला घालावा.

५) लसूण लाल रंगाचा होऊ द्यावा मग त्यामध्ये  लाल तिखट, हळद व शेगंदाणे घालून चांगले परतून घ्यावे.

७) फोडणी व्यवस्थित परतली असे लक्षात येताच त्यात डाळ व पालकाचे मिश्रण टाका.

८) भाजीला व्यवस्थित उकळून घ्यावे.

झाली आपली चविष्ट पालक भाजी तयार. ही भाजी भातासोबत खाऊ शकता. अप्रतिम लागते. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here