चरबी वाढते किंवा जास्त पौष्टिक नसतो, असे गृहीत धरून अनेक लोक रवा खाण्याचे टाळतात. परंतु प्रत्यक्षात रवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण खरे पाहता रव्यामध्ये प्रोटीन, कर्बोहायड्रेट, फायबर असे अनेक पोषक तत्व आहेत. ज्यांना हे माहिती आहे ते लोक ठरवून सकाळी नाश्त्यात उपमा, शिरा आणि रव्यापासून बनणारे इतर पदार्थ खात असतात. आज जाणून घेऊयात रव्याचे पदार्थ खाण्याचे फायदे :-
१) रव्यामध्ये फायबर भरपूर असतात. फायबर हे वजन कमी करण्यास मदत करतात.
२) फायबरमुळे मधुमेह नियंत्रणात येतो.
३) अनिमियासारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत करते.
४) रव्यातील पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
५) सकाळी रव्याचे पदार्थ खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
६) शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
रव्याचे हे पदार्थ बनवा – शिरा, आप्पे, रव्याची बर्फी, रव्याचा उपमा, रव्याचा लाडू, डोसा, इडली.
टीप – रवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगते. परिणामी पोटदुखी सारखा त्रास होऊ शकतो. म्हणून रवा प्रमाणातच खावा.
संपादन : संचिता कदम
- सावधान… राज्यातील ‘या’ जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा फैलाव; करणार ‘एवढ्या’ कोंबड्या नष्ट
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव