टाचा दुखतात; मग ‘हे’ घरगुती उपाय करुन पहा

आजकालची बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. विशेषकरून कंबर, पाय आणि सांधेदुखीच्या समस्यांचे प्रमाणत जास्त आहे. रोजच्या होत असलेल्या धावपळीमुळे शहरासह खेड्यातील लोकांनाही पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सुज येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. उद्भवतात. तर कधी खूप वेळ उभे राहील्याने, वजन अधिक असल्यास किंवा चूकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखी लागतात. आज आम्ही आपल्याला अशाच समस्यांवर घरगुती उपाय सांगणार आहोत.

बर्फाचा शेक :-

बर्फाच्या थंडाव्यामुळे पेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते. म्हणून टाचा दुखत असल्यास बर्फाने शेकवा. कालावधी – १५ मिनिटे.

तेलाची मालिश :-

टाचांचे दुखणे कमी करण्यासाठी तेलाची मालिश हा उत्तम उपाय आहे. तेलाने मसाज केल्याने मसल्स रिलॉक्स होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. मसाज करण्यासाठी खोबरेल तेल तसेच मोहरीचे तेल वापरावे. (दिवसातून ३ वेळा १०-१० मिनिटे मसाज करावा)

हळदीचा प्रयोग :-

एक ग्लास दूधात अर्धा चमचा हळद घालून ५ मिनिटे मंद आचेवर गरम करा. नंतर दुधात एक चमचा मध घाला आणि प्या. टाचांचेच नाही तर शरीरातील इतर भागातील दुखण्यापासून आराम देण्यासही मदत होते.

मीठ आणि पाणी :-

तळवे, टाचांचे दुखणे दूर करण्यासाठी मीठाचे पाणीही उपयुक्त ठरते. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे जाडे मीठ घाला. ते नसल्यास बारीक मीठ वापरले तरी चालेल. त्यानंतर त्या पाण्यात १५-२० मिनिटे पाय बुडवून ठेवा. दुखण्यावर आराम मिळेल. त्यानंतर साध्या पाण्याने पाय धुवा व त्यावर मॉईश्चराईजर लावा.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here