राऊत-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांचा गौफ्यस्पोट; वाचा, काय म्हटलंय पाटलांनी

मुंबई :

शिवसेना नेते संजय राऊत आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राजकीय भेट कमालीची गाजली आहे. रोज त्या भेटीवरून विविधपक्षीय नेते आपापली मेट सांगत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोठे राजकीय सूचक विधान केले आहे. ‘दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते एकमेकांना भेटत असतील, दोन-अडीच तास बोलत असतील तर ते चहा-बिस्किटावर नक्कीच बोलणार नाहीत. त्यात राजकीय चर्चा होणारच’, असे सूचक वक्तव्य पाटलांनी केले आहे.

पाटील यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. यावेळी पाटील यांनी एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, संजय राऊत व फडणवीसांच्या भेटीत राजकीय विषय निश्चितच होते. पण त्यातून कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही.  

करोनामुळं सध्या संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कुणालाही निवडणुका नको आहेत. त्यावर अन्य पर्यायही समोर येऊ शकतो. यापुढं भाजप राज्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल, असेही त्यांनी अधिक माहिती देताना स्पष्ट केले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here