नक्की कोणाला ठोकायचे; ‘त्या’ मुद्द्यावरून शिवसेनेचा संभाजीराजेंना सवाल

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज मराठा आरक्षणाच्या विषयावर भाष्य केले आहे. तसेच त्या मुद्द्यासंबंधित असणाऱ्या ईतरही विषयांवर उहापोह करण्यात आलेला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-    

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती व बारा बलुतेदार अशा बहुजन समाजाला एकत्र केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे खासदार संभाजीराजे सांगत आहेत. मराठा समाज राजकीय झेंडे बाजूला ठेवून एकवटल्यानेच क्रांती झाली. पुन्हा धनगर, आदिवासी, इतर मागास वर्गाच्या तोंडचा घास काढून आपल्याला काहीच नको असे मराठा समाजाचे सांगणे आहे. सरकारने जे केले ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले नाही. त्यामुळे समाजात निराशा आणि वैफल्य आले आहे व त्याच उद्विग्नतेतून सातारचे छत्रपती उदयनराजे यांनी सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा, गुणवत्तेनुसार मेरिटवर सर्वांची निवड करा अशी भूमिका घेतली.

मराठा समाजाची आर्थिक स्थिती बरी नाही, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश नाही की नोकऱ्यांत प्राधान्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील मुलांना नैराश्य येत असल्याचे खासदार उदयनराजे यांचे मत आहे. येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणाऱ्यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण याप्रश्नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here