#CoupleChallenge मध्ये होऊ नका सहभागी; पोलिसांनी दिला ‘हा’ इशारा

मुंबई :

समाजमाध्यमांवर नेहमीच विविध ट्रेंड सुरु असतात. सध्या #CoupleChallenge हा ट्रेंड जोरात चालू असल्याचे दिसत आहे. पण समाजमाध्यमांचे एक वैशिष्ट्य आहे की, जेवढे तुम्ही तिथे आपले विचार, वैयक्तिक माहिती, फोटो या गोष्टी टाकता तेवढं त्याचा दुरुपयोग होत असतो. #CoupleChallenge च्या माध्यमातून आपण आपल्या जोडीदारासह फोटो टाकण्याचे आवाहन केले जाते. व त्या ट्रेंडमध्ये जगभरातून कोट्यावधी लोक सहभागी झाले आहेत.

आपण टाकलेल्या फोटोचा आपल्या नकळत सहजपणे दुरुपयोग होऊ शकतो, हे क्युट असं कपल चॅलेंज आपल्यासाठी खपल चॅलेंज होऊ शकत, असे म्हणत पुणे पोलिसांनी काही सूचना दिल्या आहेत. आपली वैयक्तिक माहिती व फोटोद्वारे कुणीही त्याचा गैरउपयोग करू शकतो. अगदी विचित्र ठिकाणी याचा उपयोगही होऊ शकतो. जे की आपल्याला महागात पडणारे आहे. स्रीयांच्या फोटोचा गैरवापर होण्याच्या शक्यता जास्त असतात. असे अघटीत प्रकार घडू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. तसेच आपल्या फोटोचा गैरवापर होऊ न देण्यासाठी इशाराही दिला आहे.

संपादन : स्वप्नील पवार        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here