CAG ने केला गुजरात मॉडेलचा पर्दाफाश; वाचा, काय घडलाय प्रकार

मुंबई :

कोरोनाच्या या महामारीत गुजरातचं आयुष मंत्रालय निकृष्ट औषधे देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. CAG ने केला गुजरात मॉडेलचा पर्दाफाश केला असल्याचं कॉंग्रेस नेते व माजी आमदार भाई जगताप यांनी केला आहे.

गुजरातच्या स्वास्थ्य सेवांची पोलखोल झाली आहे. गुजरात मॉडेल आता दम तोडतोय. गुजरातमधील आयुष मंत्रालय निकृष्ट औषधे देत असल्याचे ट्वीट करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

यापूर्वीही गुजरातमधील कोरोना परिस्थिती गंभीर असल्याचे कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी समोर आणले होते. त्यानंतर आता तेथील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. भाई जगताप यांच्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. प्रवीण पुणेकर यांनी म्हटले आहे की, गुजरातच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा स्वतःच्या राज्य सरकारने काय तीर मारलेत ते बघा भाई जगताप! 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झालेत, जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा!

वैभव औटी यांनी म्हटले आहे की, हवेचे फुगे जास्त दिवस नाही टिकत. एक ना एक दिवस फुटतातच. दम तोडतोय गुजरात मॉडेल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here