राज्यातील ‘त्या’ शहरात बंदी असतानाही उघडले मंदीर; वाचा, पुढे काय घडले

लातूर :

जगभरात कोरोनाचा हाहाकार अजूनही थांबलेला नाही. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच आहे. महाराष्ट्रासह देशात अजूनही काही ठिकाणी निर्बंध कायम आहेत. अशातच सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवणारा एक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील माखणी थोर गावातील हनुमान मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

राज्यभरात मंदिर उघडण्यासाठी अद्यापही परवानगी दिलेली नाही. हे हनुमान मंदिर राज्यातील तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सदर माहिती ग्रामपंचायतला समजताच ग्रामपंचायती कार्यालयाने मंदिर व्यवस्थापन समितीला नोटीस बजावत योग्य ती समज दिली आहे.     

माखणी थोरचे सरपंच श्रीनिवास अशोक याविषयी बोलताना सांगितले की, शनिवारी भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आल्याचं कळाल्यानंतर नोटीस बजावण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान राज्यभरात अनेक नेत्यांनी तसेच संघटनांनी मंदिरे खुले करण्यासाठी मागणी केली. तसेच आंदोलनही केले मात्र कोरोनाचा धोका अद्यापही कायम असल्याने मंदिर खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात (ऑक्टोबर) मंदिर खुली करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here