सुशांतसिंह केस: सीबीआयच्या निवेदनानंतर गृहमंत्र्यांनी उभा केला ‘तो’ महत्वाचा सवाल

मुंबई :

प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी अनेक वाद सुरु झाले. नंतर या केसला राजकीय अंगही मिळाले होते. आता मात्र मुंबई पोलिसांकडून ही केस सीबीआयकडे गेली आहे. जवळपास महिन्याभराने सीबीआयने निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की, सुशांत प्रकरणात सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व बाजुंनी तपास सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत’, असे म्हटले आहे.

या प्रकरणात महाविकास आघाडीतील एका मंत्र्यांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न झाला होता. मुंबई पोलीस सदर मंत्र्यांना वाचवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर ही केस सीबीआयकडे गेली. जवळपास दीड महिना उलटत आल्यावरही सीबीआयच्या हाती काहीच ठोस न लागल्याचे सीबीआयने स्पष्ट केले. यावरून देशमुख यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.

गृहमंत्री देशमुख म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस प्रोफेशनल पद्धतीने हाताळत होते. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआय तपासाचा निकाल काय यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?,’ असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here