सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; सोन्याच्या दरात झाली ‘एवढी’ मोठी घसरण

मुंबई :

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सोन्याच्या दरात मोठे उतार चढाव येत होते. नेमकं सोने खरेदी करावं की नाही अशी संभ्रमाची अवस्था गुंतवणूकदारांची होती. पण दिवसेंदिवस सोन्याचे भाव आता उतरत चालले आहेत. गेल्या 6 महिन्यात सोन्याच्या दरात जवळपास ७ हजारांची घसरण झाली आहे. 7 ऑगस्टला सोनं प्रतितोळा 56 हजार 200 रुपये इतकं होतं मात्र आता सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजार 595 आहे. जीएसटी धरून 51 हजार 083 रुपये प्रती तोळा इतके मूल्य सोन्याचे आहे.

एकूणच सोन्याची भाव घसरल्यामुळे सोने खरेदी करण्यास उत्तम संधी आहे. चांदीचे दर प्रति किलो 58 हजार 583 रुपये इतका आहे. गुंतवणूकदारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असल्याचे बोलले जात आहे. या सोने-चांदीच्या दरांविषयी माहिती देताना पूना गाडगीळचे सीईओ अमित मोडक यांनी सांगितले की, अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प यांना जिंकायचे असेल डॉलरचे मूल्य स्ट्रॉंग ठेवावे लागेल. आणि जेव्हा करन्सी स्ट्रॉंग असते तेव्हा सोन्याचे दर उतरतात. त्यामुळे पुढचे काही दिवस हे दर असेच असतील.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किंमतीत मंदी आल्यामुळे सोन्याचे भाव कमी झाल्याचं पाहिला मिळत असल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी दिली.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here