राऊत-फडणवीसांच्या भेटीबाबत ‘त्या’ शिवसेना मंत्र्यांचा नवा गौप्यस्फोट; वाचा अधिक

मुंबई :

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीवरून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे या बैठकीविषयी दोन्ही पक्षातील नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना माहिती नव्हते, असेही समोर आले होते. मात्र शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी ‘मुख्यमंत्र्यांना या भेटीची कल्पना होती’, असा नवा गौप्यस्फोट केला आहे.

अनिल परब यांनी सांगितले की, शिवसेनेत गुप्त काही होत नाही. खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही गुप्त नव्हती. मुख्यमंत्र्यांना या भेटीची कल्पना होती. या भेटीबाबत सुरुवातीला गुप्तता पाळण्यात आली पण माध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केल्यावर राऊत आणि फडणवीस यांनी आपापल्या बाजूने स्पष्टीकरण दिले.

स्पष्टीकरण देऊनही राजकीय वर्तुळातील चर्चा थांबलेल्या नव्हत्या. अशातच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. त्यामुळे राऊत- फडणवीस बैठकीला अधिकच महत्व प्राप्त झाले. याच विषयावर बोलण्यासाठी पवार गेले असावेत, असेही अंदाज बांधण्यात आले.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here