धक्कादायक : बंदी घातलेले ‘ते’ चिनी अ‍ॅप्स पुन्हा भारतात पण नव्या ‘अवतारात’; झालेत लाखो डाउनलोड

मुंबई :

सुरक्षेचा मुद्दा पुढे आणत भारत सरकारने सुरुवातीला ५९ आणि दुसऱ्या टप्प्यात ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. अद्यापही भारत-चीन तणाव निवळला नसल्याने त्या अ‍ॅप्सवरील बंदी कायम आहे. मात्र आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंदी घातलेले ‘ते’ चिनी अ‍ॅप्स भारतात पुन्हा आले आहेत. या अ‍ॅप्सच्या अवतारात बदल झाल्यामुळे लाखो लोकांनी ते डाउनलोड केले आहेत.  

इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार Kwai  नावाचं एक चीनी अ‍ॅप भारत सरकारनं बॅन केलेलं आहे. स्नॅक व्हिडीओ हे अ‍ॅप एकदम Kwai या अ‍ॅपप्रणाणे दिसत आहे आणि त्याचे कोट्यावधी डाउनलोडसही झालेले आहेत. टिकटॉकसारखेही एंगेज करणारे फीचर्सही यात दिलेले आहेत. Hago नावाच्या अ‍ॅपबाबतीतही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याविषयी बोलताना सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतंही बॅन करण्यात आलेलं चिनी अ‍ॅप नव्या रूपात उपलब्ध होऊ दिलं जाणार नाही. जर अशा पद्धतीने चीनी अ‍ॅप्स भारतात येत असतील तर आम्ही कठोर पावले उचलू.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here