म्हणून संतप्त राहुल गांधी म्हणाले; भारतात लोकशाही मेलीय, ‘हा’ घ्या पुरावा

दिल्ली :

देशभरात सध्या शेतकरी विरोधी विधेयकांविरोधात आवाज उठवला जात आहे. कॉंग्रेसही या विधेयाकांवरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी इंडियन एक्स्प्रेस च्या वृत्तपत्र ट्वीट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातोय. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा’, असे म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली.

सदर सर्व विधेयकांवर राष्ट्रपतींनी आज स्वाक्षरी केली. हे विधेयके मंजूर होत असताना बराच गोंधळ झाला होता. संभ्रमाची परिस्थिती असतानाही भाजपने ही विधेयके मंजूर करून घेतल्याचा आरोप केला गेला. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्यानंतर ‘विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाही’, असे विधान राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केले. मात्र इंडियन एक्स्प्रेसनं प्रसारित केलेल्या वृत्तात वेगळं चित्र होतं.

त्यावरून ‘आता लोकशाही मेली आहे’, अशी भावना व्यक्त करत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. सध्या देशभरात अनेक ठिकाणी मंजूर झालेल्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधात आंदोलन होत आहे. २०० पेक्षा अधिक शेतकरी संघटनांनी एकत्र येत ‘भारत बंद’ आंदोलनही केले. या ‘भारत बंद’ आंदोलनात विविध विरोधी पक्षांसह कॉंग्रेसनेही सहभाग घेतला होता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here